shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - २०२४

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त
 १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक / विमाका वृत्तसेवा:
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान २६ जून २०२४ रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (इ.पी.आय.सी.) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (इ.पी.आय.सी)  व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे,असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.


हे पुरावे असणार ग्राह्य

१) आधार कार्ड, २) वाहन चालक परवाना, ३) पॅन कार्ड, ४) भारतीय पारपत्र, ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, ७) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र, १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
पत्रकार राजु मिर्जा,नाशिक
सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close