shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

न्यू लॉ कॉलेज चे परशुराम चंद्रकांत म्हस्के यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

शिक्षक व कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य लाभले -- श्री .परशुराम म्हस्के

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर :  दि १७ /   अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथील महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक श्री. परशुराम चंद्रकांत म्हस्के पा. हे रविवार दि. ३०/६/२०२४ रोजी ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव समारंभ शनिवार दि. १५/६/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. असेंब्ली हॉल. न्यू लॉ कॉलेज,नगर येथे संपन्न झाला .

या प्रसंगी अध्यक्ष मा. अॅड. विश्वासराव दत्तात्रय आठरे , प्रमुख अतिथी ह.भ.प. मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे (राष्ट्रीय संत, श्रीक्षेत्र पंढरपूर) प्रमुख उपस्थिती मा .श्री. जयंत रामनाथ वाघ ,श्री.जी.डी. खानदेशे , श्री. मुकेश माधवराव मुळे ,डॉ. विवेक प्रभाकर भापकर साहेब , नंदकुमार भाऊसाहेब झावरे , डॉ. चंद्रराव कृष्णराव मोरे , श्री. रामचंद्रजी हरिभाऊ दरे ,अॅड. दिपलक्ष्मी संभाजीराव म्हसे ,श्री. सिताराम विठ्ठलराव खिलारी  यांचे उपस्थितीत गौरव समारंभ संपन्न झाला .

यावेळी म्हस्के सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य लाभले . त्यामुळे ३९ वर्षे नोकरी चा काळ आनंदाने पूर्ण केला . आज निवृत्त होत असून या नोकरीचा काळ नेहमीच आठवणीत राहिल .


सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य तसेच प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .
close