सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी वेबसिरीज 'मटका किंग' मध्ये सई ताम्हणकर झळकणार आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने मराठी सिनेसृष्टीला नव्या उंचीवर घेऊन गेले आहेत, आणि त्यांच्या प्रत्येक प्रकल्पाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असते.
काही दिवसांपूर्वी, सई ताम्हणकरने तिच्या दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. त्यात 'मटका किंग' हा एक प्रमुख प्रोजेक्ट आहे. या वेबसिरीजमध्ये ताम्हणकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सईने नागराज मंजुळे यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद व्यक्त केला आहे. ' झुंड ' या हिंदी चित्रपटानंतर नागराज मंजुळे यांची ही वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.
सई ताम्हणकरने ' भक्षक', 'अग्नि', ' ग्राउंड झिरो' सारख्या प्रोजेक्ट्समध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. आता 'मटका किंग' मध्ये ती विजय वर्मा सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि सई ताम्हणकरचा अभिनय यांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.
नागराज मंजुळे यांचे चित्रपट नेहमीच हटके असतात. त्यांच्या प्रत्येक यशस्वी प्रकल्पामुळे त्यांची दिग्दर्शनातुल उंची वाढत आहे.आपण नागराज मंजुळे आणि सई ताम्हणकर यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देऊयात आणि या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करूया..!