shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हार्मनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद


 विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी पालक व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे प्रा. कैलास जाधव यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : दि . 9 /   हार्मनी इंटरनॅशनल स्कूल वडगाव गुप्ता येथे शनिवार दि . 8 जून रोजी 2024 / 25 या शैक्षणिक वर्षासाठी  पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक बेरड यांनी शाळेची शैक्षणिक प्रगती तसेच शाळेचा आढावा या सभेत सादर केला . प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी लेखक व व्याख्याते  प्राध्यापक कैलास जाधव उपस्थित होते.


 याप्रसंगी 2022 / 23 शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच पालकांना सर्व शिक्षक वृंदांचा परिचय करून देण्यात आला.


 जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी पालक व शिक्षक हा त्रिकोण पूर्ण झाला तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी पालकांची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक शारीरिक जडणघडण करत असताना त्यांना घरूनच संस्कारक्षम बनविणे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी सतत संवाद साधावा. फक्त विषय न शिकवता विद्यार्थी एक उत्तम नागरिक कसा होईल यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुवर्णा कदम यांनी केले . आभार अंजली जग्गी यांनी मानले .
close