श्रीरामपूर / प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून गुलाब पुष्प देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना बुट, सॉक्स यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सर्वश्री योगेश देवकर, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे रवींद्र पवार,राऊत बाबा,वेताळ सौ. मनीषा दासरजोगी, मुख्याध्यापिका कनेरकर, राशिनकर,श्रीमती भारती खाडे, बाबासाहेब थोरात , रणपिसे, बाळासाहेब पाटोळे, श्रीमती मंगल सातोरे आदी यावेळी उपस्थित होते. मिष्ठांन्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111