प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
शिवसेना ५८ वा वर्धापन दिनानिमित्त केज तालुक्यात मौजे वरपगाव येथे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या हस्ते व तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा उद्घाटन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा सचिव रोहित कसबे ,शहर प्रमुख तात्या रोडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख लहु केदार शाखा प्रमुख ,प्रदीप देशमुख,उप शाखा प्रमुख आरुण देशमुख, शाखा सचीव आप्पा कांबळे, कार्याध्यक्ष गणेश देशमुख,सह सचिव बालासाहेब देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश देशमुख, आण्णासाहेब देशमुख व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते*