shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

*खाजगी आस्थापनेत काम करणाऱ्या शिक्षक मतदारांना मतदानासाठी २ तासांची विशेष सवलत


नाशिक विमाका वृत्तसेवा:
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक  २०२४ साठी आज बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी  ६.०० मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.



        या निवडणूकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तीक रजा लागू होत नाही. याकरिता खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान कालावधीत २ तासांची विशेष सवलत देण्यात यावी असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे.

*पत्रकार राजू मिर्जा
(प्रभारी: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close