अकोले ( प्रतिनिधी )तालुक्यातील कळस बु येथील माजी सैनिक विठ्ठल भुसारी महाराष्ट्र शासन नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी यांची पदी निवड झाली आहे.
राज्यसेवा आयोगाच्या मार्फत अ वर्ग मुख्य परीक्षा 2023 च्या मध्ये नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी पदासाठी परीक्षा झाली होती त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात भुसारी यांनी यश मिळवले. यापूर्वी त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय लिपिक पदी निवड झाली होती तसेच राज्य राखीव पोलीस (एस आर पी एफ ) अहमदनगर कुसडगाव व मुंबई पोलीस मध्ये ही निवड झाली.
विठ्ठल भुसारी हे शेतकरी कुटुंबातील असून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते कळस येथील जयकिसान सह दूध संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब भुसारी यांचे ते चिरंजीव आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, संगमनेर साखर कारखाने संचालक संभाजी वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे अध्यक्ष सुरेश गडाख, ह भ प गणेश महाराज वाकचौरे, माजी सैनिक शशिकांत वाकचौरे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.