shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यांचा आई एम ए कडून निषेध; चौकशीची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी 
भारतामधे विविध वैद्यकिय  अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  नीट परीक्षा म्हणजेच नॅशनल  एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट परीक्षा घेतली जाते. 2016 पासून ही प्रवेश परीक्षा सुरु  झाली. यात एका प्रश्नाला  अनेक पर्यायी उत्तरे असतात. एकंदर 180 प्रश्न असून  योग्य उत्तरास 4 गुण व अयोग्य उत्तरास 4 गुण कमी होतो एकूण 720 गुणांची परीक्षा असते. या गुणावर्ती वैद्यकीय प्रवेश निच्छित  होतो.

नेशनल टैलेंट एजेंसी अर्थात  एन टी ए या मार्फ़त परीक्षा घेतली जाते. 2023 मधे  2038596 विद्यार्थी तर  2024 या वर्षी 2333297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . 
4 जून रोजी निकाल लागला  असून अनेक विद्यार्थ्यांना 718/719 असे  गुण  मिळाले. जे नेगटिव मार्किंग  मधे शक्य नाही. 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले .हरियाणा  मधील फरीदाबाद एकाच केंद्रातील 7 विद्यार्थ्यांना  720 गुण मिळाले. पूर्व  माहिती दिलेली नसताना  काही  विद्यार्थ्यांना ग्रेस  मार्कस देण्यात आली . याचाच अर्थ हा पेपर  फुटलेला होता. बिहार मधे  पेपर लिक झाल्याची बातमी  मिळाली परंतु वेळीच दख़ल  घेतली गेली नाही. थोड़े फार  प्रकार पूर्वीही होत होते  परन्तु यावर्षी कळसच  गाठला . बऱ्याच वेळा  एजेंट्स फ़ोन करुन  ठराविक  केंद्र घ्यायला सांगतात . 
  4 जून ही निकालाची  तारीख नसताने तो जाहीर  केला जेणेकरून जनरल  इलेक्शन मुळे याकडे   मीडियाचे व नागरिकांचे दुर्लक्ष  होईल. परन्तु आता  विद्यार्थी व पालक यामधे  तीव्र असंतोष निर्माण झाला  आहे . नीट परीक्षा म्हणजे  विद्यार्थ्यांचे तसेच भावी  डॉक्टरांचे पर्यायाने  सामाजिक आरोग्याच्या  सुरक्षिततेचा प्रश्न आहे .
 झालेला प्रकार दुर्दैवी आहे . या प्रकरणात सीबीआई  चौकशी  लावावी.आई एम  ए , जूनियर डॉक्टर संघटना , पालक यांनी निषेध करत एन  टि ए , गृह मंत्री यांना पत्रव्यवहार करुन परीक्षा रद्द  करावी व पुनच्छ घ्यावी  असी मागणी केलेली आहे व  उच्च व  तांत्रिक  शिक्षण मंत्रालय खात्याने  दुजोरा  दिलेला आहे.

*डॉ.रविंद्र कुटे*
पुर्व अध्यक्ष : आई एम ए. (महाराष्ट्र राज्य) 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close