shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक कारखान्याच्या व्हा.चेअरमन पदावर हिम्मतराव धुमाळ यांची बिनविरोध निवड


श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा.चेअरमन पदावर श्री. हिम्मतराव माधवराव धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन श्री.पुंजाहरी शिंदे यांनी आपले पदाचा राजीनामा दिल्याने सदर पदासाठी निवडणूक अधिकारी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर श्री.गणेश पुरी यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस कारखान्याचे चेअरमन माजी आ.श्री. भानुदास मुरकुटे यांचेसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. निवडी प्रसंगी व्हा.चेअरमन पदासाठी श्री.हिम्मतराव धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री.बाबासाहेब कडुजी आदिक यांचे सूचनेस श्री.आदिनाथ निवृत्ती झुराळे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर श्री.हिम्मतराव धुमाळ यांचा माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, व्हा.चेअरमनपद हे दरवर्षी बदलण्यात येईल, असा लोकसेवा विकास आघाडीचा निर्णय होता. त्यानुसार श्री.पुंजाहरी शिंदे यांनी आपले पदाचा राजीनामा दिला. श्री.पुंजाहरी शिंदे यांनी वर्षभर अत्यंत जबाबदारीने काम केले. असेच काम नूतन व्हा.चेअरमन श्री.हिम्मतराव धुमाळ हेही करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक अधिकारी श्री.गणेश पुरी यांचेही त्यांनी आभार मानले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक संतोष देवकर उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close