shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सकल ओबीसी व बहुजन समाजाच्या वतीने गुरुवारी केज बंद..!!

                                                    
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                        ..........                                         
सकल ओबीसी समाज व बहुजन समाजाच्या वतीने आज बीड लोकसभेच्या उमेदवर मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह व अश्लील भाषेत व्हिडिओ व पोस्ट काही समाजकंटकाकडून पसरवण्यात येत आहेत.मा.पंकजाताई मुंडे या महिला असून बहुजन, ओबीसी, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय व वंचित घटकांचे नेतृत्व करतात व त्या स्वतः त्या समाजाच्या असल्याने काही लोक त्यांच्यावर खालच्या पातळीवर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर जाणिवपूर्वक पसरवत आहेत.त्यासंबंधी वारंवार केज पोलिस स्टेशनमध्ये तोंडी व लेखी तक्रार देण्यात आली आहे तरी संबंधितांवर कुठलिही कारवाई किंवा अटक झालेली नाही.                                    

अशा प्रवृत्तीच्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त करुन कडक कारवाई करावी यासाठी गुरुवार दिनांक 13.06.2024 रोजी केज शहर बंद ठेवण्यात येणार आहे . याचे लेखी निवेदन केज तहसील येथे नायब तहसीलदार वाघ मॅडम व केज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना देण्यात आले आहे.                                  

      

यावेळी सकल ओबीसी समाज व बहुजन समाजातील तसेच मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close