shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ शिक्षक मतदार संघात ३८ पैकी २ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध


नाशिक विमाका वृत्तसेवा:
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४  ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली.३१ मे २०२४ ते ७ जून २०२४ या  कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

अमोल बाळासाहेब दराडे  आणि सारांश महेंद्र भावसार यांचे ३० वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे " अवैध" ठरले आहेत. दराडे किशोर भिकाजी यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार बोठे रणजित नानासाहेब यांचे प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला, व श्री. दराडे किशोर यांचे नामनिर्देशन पत्र "वैध ठरविण्यात आले.

 ३६ उमेदवार वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले आहेत. ज्या उमेदवारांना माघार घ्यावयाची असेल ते दि.१२ जून २०२४  रोजी दुपारी ३ वाजेपर्यत उमेदवार माघार घेऊ शकतील.

*लियाकतखान पठाण - नाशिक
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111
close