परळी वैजनाथ:-
आज परळी येथे लक्ष्मण हाके यांनी मुळ ओबीसी बचाव आंदोलन केले..त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ सकल ओबिसी समाजाच्या वतीने पाठींबा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्या प्रसंगी वडार समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते संजय देवकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सर्व मुळ ओबीसींनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे तरच मुळ ओबीसी समाजांचे आरक्षण टिकून राहील..
आपले आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून मुळ ओबीसींचे आरक्षणावर घाला येऊ नये, यासाठी हे आंदोलन आहे ..आपण सर्व मुळ बारा आलूतेदार बलूतेदारानी एकत्रितपणे लढा दिला तर आपल्या सर्व समाजांना न्याय मिळेल असे मत मनोगतातून व्यक्त केले. यावेळी अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.