shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य सहकार कार्याध्यक्ष दीपक शिंदे यांचा चेंबूरमध्ये सन्मान


मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार विभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी दीपक शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे राज्य ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. 



चेंबूर येथील वाशी नाका आयोध्या नगर येथील गृहनिर्माण संस्था कमिटीच्या संघाच्या वतीने आयोजित निवडणुकीत नव्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. आयोध्या नगर गृहनिर्माण कमिटी नियोजित इथेही दीपक शिंदे यांना कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 त्याबद्दल दीपक शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. तालुका ,जिल्हा राष्ट्रवादी कमिटीच्या वतीनेही दीपक शिंदे यांचा ठिकठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सहकार क्षेत्रातील नवीन समस्यांना वाचा फोडून जनतेला अधिकाधिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दीपक शिंदे यांनी बोलताना दिली आहे.
close