shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाने अभ्यास करुन उज्ज्वल भविष्य घडवावे--सौ.अर्चनाताई आडसकर !!


   --------------------------------------      
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-

दहावी व बारावी हे वर्ग म्हणजे आयुष्याला दिशा देणारे असतात.कठोर परिश्रम, सातत्य व जिद्द ठेवुनी अभ्यास केल्यास यश मिळते असे प्रतिपादन छ.शिवाजी शिवाजी शिक्षण संस्था आडस च्या संचालिका सौ.अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी केले.
 
त्या कनिष्ठ महाविद्यालय व
वसंत  विद्यालय केज यांच्या झालेल्या फेब्रु/ मार्च 2024 मधील परीक्षांमध्ये प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्याचा गुण गौरव सोहळ्यात बोलत होत्या.
    
या कार्यक्रमात विज्ञान शाखेतील प्रथम आलेल्या कु.स्नेहल बालासाहेब यादव.कला शाखेतील प्रथम आलेला कोल्हे अभिषेक अशोक.वाणिज्य शाखेतील प्रथम आलेल्या कु.गायकवाड स्वाती विजय . व्यावसायिक अभ्यासक्रमातील नखाते ज्ञानेश्वर राजेंद्र आणि दहावीत प्रथम आलेला चौरे अथर्व   व इतर गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच NEET  परीक्षांमध्ये 621गुण मिळवलेल्या 
भराटे शशांक युवराज यांचाही 
विशेष सत्कार करण्यात आला.
     
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य प्रकाश धेंडे सर होते तर प्रस्ताविक  उपप्राचार्य श्री देशमुख हेमंत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री चाळक  आणि आभार 
प्रा.श्री सपाटे  यांनी  मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
close