शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १७ जून २०२४
जि.प्र.प्रा.शाळा वांबोरी स्टेशन येथील नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटपाने..!!
राहुरी (वांबोरी स्टेशन) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांबोरी स्टेशन येथे नवागतांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ कल्हापुरे होते. प्रसंगी गुलाब पुष्प व खाऊ देऊन इयत्ता पहिली व इतर वर्गात नव्याने दाखल झालेल्या सर्व बालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न देण्यात आले.
मुख्याध्यापक नरवडे, शिक्षक करंडे, भुजबळ, कचरे आदी. ग्रामस्थ, प्रविण सोनवणे अमोल कल्हापुरे प्रसाद शेळके कैलास लटके. व पालक वर्ग उपस्थित होता.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600