शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १७ जून २०२४
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात ; जि.प्र.प्रा.शाळा खडांबे खुर्द आणि वांबोरी स्टेशन येथील नवागतांचे पारंपरिक वाद्याच्या गजरात स्वागत..!!
राहुरी (खडांबे खु.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे खुर्द या शाळेतील इयत्ता पहिली मधील दाखल पात्र नवगत मुलांचे स्वागत तसेच मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी वाद्याच्या गजरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात होते. ग्रामस्थ,पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते. प्रथमत: इयत्ता पहिलीतील दाखल पात्र मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . . यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकां चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच आण्णासाहेब माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश हरिश्चंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर हरिचंद्रे, लक्ष्मण हरिश्चंद्रे, संदिप खळेकर, लुमेश नन्नवरे, बाळू साळे, मिनीनाथ दळवी, प्रीती नन्नवरे , स्वाती नन्नवरे, उर्मिला दुबे , कल्पना नन्नवरे , जयश्री कल्हापुरे, पूजा जाधव आदि उपस्थित होते.
जगदीश हरिश्चंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कुलट यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती विप्रदास यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्रीमती कोष्टी यांनी केले.
--------------------------------------------------------------------
जि.प्र.प्रा.शाळा वांबोरी स्टेशन येथील नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप करून..!!
राहुरी (खडांबे खु./ वांबोरी स्टेशन) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांबोरी स्टेशन येथे नवागतांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ कल्हापुरे होते. प्रसंगी गुलाब पुष्प व खाऊ देऊन इयत्ता पहिली व इतर वर्गात नव्याने दाखल झालेल्या सर्व बालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न देण्यात आले.
मुख्याध्यापक नरवडे, शिक्षक करंडे, भुजबळ, कचरे आदी. ग्रामस्थ, प्रविण सोनवणे अमोल कल्हापुरे प्रसाद शेळके कैलास लटके. व पालक वर्ग उपस्थित होता.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600