shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे - आमदार लहू कानडे


श्रीरामपूर / प्रतिनिधी 
येथील प्रभाग क्र.४ मधील अतिथी कॉलनी परिसरात स्वर्गीय खासदार गोविंदराव अदिक यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रभागाचे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांच्यावतीने भव्य वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी आमदार लहु कानडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की, भूतलावर वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असून परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. 
यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा अदिक म्हणाले की, अतिथी कॉलनी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याकरिता आदिक परिवाराकडून लागेल ते सहकार्य करू असेही त्या म्हणाल्या. 
याप्रसंगी सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फादर शिनगारे, अतिथी कॉलनीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुठे, ऍडव्होकेट विनोद तोरणे, लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहू खंडागळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष राजीव साळवे, सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी, ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माजी नगरसेविका अनिता ढोकणे, अनघा लोंढे, स्वाती पाटील, जया दळवी, तात्यासाहेब सौंदाणे, तानाजी पाटील, सुनील सिनारे, विलास दळवी,गोपाल वायदेशकर, सुभाष लिंगायत, संजय जोर्वेकर, भालेराव दादा, संजय आल्हाट,अशपाक भाई शेख, बाळासाहेब पाटोळे सर, प्रदीप साळुंखे तथा परिसरातील मान्यवर महिला भगिनी आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर

*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close