shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ऋणानुबंध च्या ब्लॅक अँड व्हाईट गीतांच्या रंगतदार कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद


अहमदनगर / प्रतिनिधी 
ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित क्लब महिंद्रा प्रायोजित 'ओ मॅजिकल ब्लॅक अँड व्हाईट म्युसिकल इव्हिनिंग' हा जुन्या गीतांचा कार्यक्रम नुकताच अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात संपन्न झाला. ब्लॅक अँड व्हाईट काळातील गाजलेल्या जुन्या गीतांच्या या कार्यक्रमास प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

ऋणानुबंधच्या कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात जुन्या काळातील अतिशय सुरेल गीते सादर करण्यात आली. कराओके आणि लाईव्ह म्युजिक असा सुंदर मिलाफ करून ४५ गीते सादर करण्यात आली. सर पे टोपी लाल हाथमे रेशम का रुमाल या गीताने डॉ. विवेकानंद कंगे आणि दुर्गा हुरे यांनी कार्यक्रमाची शानदार सुरवात केली. चौदवी का चांद, सौ साल पहले, छोड दो आंचल, दिल कि नजर से, बाबूजी धीरे चलना, मांग के साथ तुम्हारा, अजिब दास्तां है ये, प्यार हुआ इकरार हुआ, धीरे धीरे चल चांद गगन मे, याद किया दिल ने कहाँ अशा एकाहून एक सरस गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. अनेक प्रेक्षक हे ब्लॅक अँड व्हाईट पेहराव करून आले होते, तसेच स्टेजची सजावट ही जुन्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

वो शाम कुछ अजिब थी, एक लडकी भिगी भागी सी, कही करती होगी वो मेरा इंतजार, वो भुली दास्तां, अशा अनेक गीतांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ऋणानुबंधचे डॉ. कंगे आणि बी.डी. महानुर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रशांत बंडगर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना आणि काही ग्रुप्स ला रोपांचे वाटप करण्यात आले. आणि वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण याचे महत्व विषद करण्यात आले. छाया बंडगर यांच्या ग्रुपतर्फे प्रेक्षकांमधून आलेल्या महिलांनी सायोनारा या गीताच्या संगीत तालावर छोटे नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमात क्लब महिंद्रा आणि मलाबार गोल्ड कडून ८ भाग्यशाली प्रेक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी क्लब महिंद्रा, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, डॉ. काशीद हॉस्पिटल, वेद सोनोग्राफी, वसंत पेन्ट्स, साई माउली हॉस्पिटल, माधवबाग यांनी
प्रायोजकत्व स्वीकारले. साई माऊली हॉस्पिटल तर्फे येणाऱ्या प्रेक्षकांची मोफत मधुमेह आणि रक्तदाब चाचण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमात महेश घावटे, डॉ. विवेकानंद कंगे, सारिका रघुवंशी, शुभांगी ओहोळ, अजय आदमाने, दुर्गा हुरे, डॉ. शैलेंद्र खंडागळे, अपर्णा बालटे, सीमा रघुवंशी, वसंत बोरा, प्रशांत बंडगर, चारुदत्त ससाणे, भानुदास महानुर, अजित रोकडे यांनी सुरेख गीते गायली. तसेच स्टेजवरील आणि सभागृह व्यवस्था सचिन परदेशी, योगिता कर्डीले आदिंनी केली.
ऋणानुबंधच्या सदस्या चारुता शिवकुमार यांनी अत्यंत सुरेख दर्जेदार असे निवेदन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.ज्ञानेश कुलकर्णी यांच्या सहकार्याने तयार केलेले जुन्या चित्रपटातील अनेक प्रसंग आणि संदर्भ याची माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली.


*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close