shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारताविरूद्धच्या पराभवाने पाकचे भवितव्य अंधारात ?


              टि२० विश्वचषकच्या नवव्या आवृत्तीत भारताने इतिहास रचताना पाकिस्तानविरुद्धच्या विजयासह अनेक विक्रम केले. टि२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारतीय संघाचा हा सातवा विजय ठरला. या दोघांमध्ये एकूण आठ सामने झाले असून सात सामने भारताने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने एकमेव विजय सन२०२१ मध्ये दुबईत मिळवला. टि२० विश्वचषकातील कोणत्याही एका संघाविरुद्धच्या सामन्यांमध्ये हि सर्वाधिक विजयाची आकडेवारी आहे. टिम इंडियाने या बाबत पाकिस्तान आणि श्रीलंकेला मागे टाकले. पाकिस्तानने टि२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरूध्द तर श्रीलंकेने वेस्ट इंडिज विरूध्द प्रत्येकी सहा सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघ आघाडीवर पोहोचला आहे. एवढेच नाही तर टि२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा बचाव केला आहे. या बाबतीत त्याने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनीही १२० धावांचा बचाव केला आहे. श्रीलंकेने सन २०१४ च्या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध चितगाव येथे ही कामगिरी केली होती. तर भारतीय संघाने टि२० मध्ये वाचवलेला हा सर्वात कमी धावसंख्येचा सामना आहे.  यापूर्वी टीम इंडियाने सन २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 


डाॅ.दत्ता विघावे

              पाकिस्तानविरुद्धच्या टि२० मध्ये कोणत्याही संघाने वाचवलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. सन २०२१ मध्ये झिम्बाब्वेने हरारे येथे पाकिस्तानला ११९ धावांचे लक्ष्य गाठू दिले नव्हते. यानंतर टीम इंडियाचा नंबर लागतो. जसप्रित  बुमराहा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने चौदा धावांत तीन बळी घेतले. बुमराहाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. आठ महिन्यांत बुमराहने आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी सन २०२३ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात बुमराहाने पाकिस्तानविरुद्ध १९ धावांत दोन बळी घेतले होते आणि तो सामनावीर ठरला होता.

                भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारतीय संघाला १९ षटकांतच पाकने ११९ धावांत उध्वस्त केले.  प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ चौदाव्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा अशी होती. मात्र यानंतर सामन्याचा नूरच बदलला.  रिझवान-शादाब बाद झाले. जसप्रित बुमराहा एकोणावीसाव्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. विसाव्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. मात्र अर्शदीपने केवळ अकरा धावा देत इमाद वसीमला चालते केले. अशा प्रकारे टिम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले. टिम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराहा, अर्शदिप, सिराज आणि हार्दिक या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानला वीस षटकांनंतर ७  बाद ११३ धावाच करता आल्यामुळे या स्पर्धेतला सलग दुसरा पराभव त्यांच्या पदरी पडल्याने सुपर एट साठी पात्र होण्याचा त्यांच्या स्वप्नाला तडा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

             या विजयासह भारतीय संघ अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांचे चार गुण आहेत.  त्याचबरोबर भारताचा नेट रन रेटही १.४५५ असा झाला आहे. याशिवाय चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझमच्या संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडता आलेले नाही.  सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरीत दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. ११ जून रोजी बाबर आझमचा संघ कॅनडाशी भिडणार आहे, तर १६ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टि२० विश्वचषकातील छत्तीसावा सामना खेळायचा आहे. जर यातील एका जरी सामन्यात काही अघटीत झाले तर पाकचा परतीचा प्रवास स्पर्धा अंतिम चरणात पोहोचण्यापूर्वीच समाप्त होईल. आपणास ठाऊक आहेच की त्यांचा सलामीचा सामना यजमान अमेरिकेशी अपयशी झुंज देऊन संपला होता.

             पावसाने बाधीत झालेल्या सामन्यात भारतीय संघ १९ षटकांत ११९ धावांत गारद झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात शेपटाच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्मा १३, विराट कोहली ४, अक्षर पटेल २०, सूर्यकुमार यादव ७ , शिवम दुबे ३, हार्दिक पंड्या ७. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी अर्शदीप सिंग ९ धावा करून धावबाद झाला. तर सिराज ७ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार मारले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर मोहम्मद आमिरने २ विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली. रोहित शर्माची टि२० विश्वचषकात पाकविरुद्धची खराब कामगिरीची मालिका कायम राहिली तर संघ प्रबंधनाचा कोहलीला सलामीला पाठविण्याचा निर्णय सलग दुसऱ्या सामन्यात फेल गेला त्यामुळे विराटची पाकिविरुद्ध यशस्वी ठरण्याची परंपरा मोडित निघाली. त्यामुळे भारताला पाकविरूद्ध टि२०मध्ये प्रथमच कमी धावांवर सर्वबाद व्हावे लागले. शिवम दुबेला खेळविण्याचा प्रयोग फसतोय. त्याऐवजी यशस्वी जयस्वाल सलामीला तर कोहलीमधल्या फळीत खेळला तर भारताच्या डावाला आधार मिळेल.

              एकवेळ भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८९ धावा अशी होती. यानंतर टीम इंडियाने तीस धावा करताना शेवटचे सात फलंदाज गमावले. अशा स्थितीत पाकिस्तानला १२० चेंडूत १२० धावांचे लक्ष्य मिळाले. पाकिस्तान हे लक्ष सहज गाठेल असे वाटत होते. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनीही चांगली सुरुवात करून दिली.  मात्र, पाचव्या षटकात बुमराहने बाबरला तेरा धावांवर माघारी पाठवून पहिला धक्का दिला आणि भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या. पाकिस्तानला पहिला धक्का २६ धावांवर बसला. यानंतर रिझवानने उस्मान खानसोबत ३१ धावांची भागीदारी केली. दहा षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या ५७ धावा एक बाद अशी होती. शेवटच्या दहा षटकात पाकिस्तानला विजयासाठी ६३ धावांची गरज होती. यानंतर उस्मान १३ धावा करून बाद झाला. फखर झमानने येताच एक षटकार आणि एक चौकार मारला. फखर एकटाच सामना जिंकून देईल असे वाटत होते.  हार्दिक पांड्याने फखरला बाद करून आणखी एक धक्का दिला.  ७३ धावांत तीन विकेटस पडल्या होत्या. त्यानंतर इमाद वसीम फलंदाजीला आला.  दुसऱ्या टोकाला रिजवान उभा होता. मात्र, तोही अडकून पडला होता. पंधराव्या षटकात बुमराहा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर रिजवानला क्लीन बोल्ड केले.  त्याला ४४ चेंडूत ३१ धावा करता आल्या. येथून बुमराहाने सामना भारताकडे वळवला. मात्र, त्यावेळचे सर्वात मोठे टेन्शन म्हणजे भारतासाठी पुढील पाच षटकांपैकी चार षटके वेगवान गोलंदाजांसाठी उरली होती.

              एक षटक अक्षर किंवा जडेजा यापैकी एकाला टाकावे लागणार होते. पंधरा षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ८३ धावा अशी होती.  त्यांना शेवटच्या पाच षटकांत ३७ धावांची गरज होती.  इमाद वसीम आणि शादाब खान क्रीजवर होते. कर्णधार रोहितने सन मध्ये पाकिस्तान संघासारखी चूक केली नाही आणि शेवटच्या षटकापर्यंत फिरकीपटूला वाचवले नाही.  रोहितने सोळावे षटक अक्षरकडे सोपवले आणि अक्षरने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने फक्त दोन धावा दिल्या. येथून भारताने सामन्यात पुनरागमन केले.

                नशिब बलवत्तर म्हणून भारत निव्वळ बचावलेच नाही तर जिंकलेली. मात्र येथून पुढे समतोल संघ निवड होणे गरजेचे असून गरज आहे त्याच खेळाडूला खेळवावे. नशिब दर वेळेस साथ देत नसते. टिम मॅनेजमेंटच्या चुका पराभवाचे कारण ठरायला नको.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close