shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नाशिक शिक्षक मतदारसंघात पै. डॉ.पानसरेचा विजय निश्चितच

नाशिक:-
नाशिक शिक्षक आमदारकी मतदार संघात पैलवान डॉक्टर छगनराव पानसरे यांचे कार्य जोरात चालू असून नुकतीच  ओलंपिक व आशियाई, कॉमनवेल्थ चे पंच व अशोकराव दुधारे नाशिक, रामचंद्र मोरे टीडीएफचे जिल्हाध्यक्ष नाशिक ,क्रीडा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर आदी मान्यवर एकत्र येत नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या घटनेविषयी चर्चा झाली. पै.डॉ.पानसरे यांनी टीडीएफ विषयी आदर व्यक्त केला,


पण आता टीडीएफ मध्ये कोणत्याही तरुणांना संधी दिलेली नसल्यामुळे टीडीएफ फक्त वयस्करच लोकांची संघटना आहे .टीडीएफ चा पहिला सभासद सर्वच उमेदवार पैकी पैलवान पानसरे सीबी आहेतअसल्यामुळे टीडीएफ संघटनेचा दावेदार मी आहे. पहिली निवडणूक मी बहुजन आघाडीतून लढवल्यामुळे बहुजन माझ्या सोबतच आहेत.तसेच माझ्या सोबत राष्ट्रीय मूलनिवासी, खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक राज्य संघटना, शिक्षक प्रशिक्षण संघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय समाज पार्टी ,हिंदुस्थान जनता पार्टी, पेन्सिल धारक संघटना, क्रीडा संघटना, शिक्षक भारतीय संघटना आधी संघटना सोबत असून. भाजपमध्ये कामगार आघाडीमध्ये नाशिक विभागात मी काम केलेला आहे व मला तिकीट मिळणार होते, परंतु माझा वापरच केला.मी अपक्ष ही निवडणूक लढवत आहे. मला निवडणुकीत व्यत्याय यावा म्हणून चार पानसऱ्यांचे फॉर्म भरले होते परंतु दिलीप पानसरे, दत्ता पानसरे माझ्या मोठ्या भाऊंनी यांनी मला साथ देऊन फॉर्म मागे काढून घेतल्यामुळे तिथेच माझा विजय झालाआहे. पहिलवान विजयश्री मीच खेचून आणणार आहे. *जे नेते  लाईट,पाणी,रस्ते,शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकले नाही हे शिक्षकाचे प्रश्न काय सोडवणार* तसेच या घटनेमध्ये निवडणुकीमध्ये संस्थाचालक व रिटायर झालेले पेन्सिल घेणारे शिक्षक असल्यामुळे त्यांना पेन्शनचे काही घेणे देणे नाही? तर काहींना फक्त शिक्षक सोसायटीमध्ये आपले अस्तित्व टिकवायचे आहे.यासाठी उभे आहेत,परंतु मी खास शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत आहे.

 संघटनेसोबत राहून अनेक शिक्षकांच्या अडचणी यापूर्वी सोडवलेले आहेत .शिक्षकांचे पगार महाराष्ट्र बँकेत होतात यात आम्हाला मोठे यश आलेले आहे. एकंदर माझ्या कार्याचा आढावा पाहता जनता माझाच विचार करतील गेल्या वीस वर्षात शिक्षकाचे प्रश्न कमी झाले नाही ?शिक्षकाचे प्रश्न कितीतरी पटीने वाढलेले आहेत ,की ज्याची गिनती करणं मुश्कील आहे. लबाड लांडगे ओळखा.*पेन्सिलचा प्रश्न सोडूं सोडू म्हणत म्हणत चार आमदार झाले एकानेही दिवे लावले नाही* पुढचं भविष्य ओळखा.सदर घटनेत जर संस्थाचालक निवडून आले तर शिक्षकांचे भविष्य पूर्णपणे अंधारात आहे . शिक्षकाचा अवतार घेऊन बसलेली भोकाडी ओळखा. निवडणुक आली का घोषणा करतात व निवडून गेले की गायब होतात.शिक्षकांनी वेळेत विचार करून हाडाच्या शिक्षकाला सहकार्य करावे व विजयश्री खेचून आणावी . सन्माननीय दुधारे सर माझे कुस्तीतले गुरुच आहेत. रवींद्र मोरे सरांचा मी विद्यार्थी आहे .तर राजेंद्र कोतकर हे माझे मार्गदर्शक आहेत यामुळे सर्वांचे आशीर्वादामुळे माझी नोका विजयश्री खेचून पैलतीराला जाईल ,हे निश्चित..
close