shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून केलेले कार्य डॉ. दत्ता विघावे यांना पद्मश्री मिळवून देण्यास पुरेसे - प्रकाश कुलथे


श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला असून सन २०२३-२०२४ पर्यंत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या गंगाखेड (परभणी) येथील संगीताताई जामगे यांना " वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिझरी अवॉर्ड २०२४" हा देऊन गौरविण्यात आले. तर इतर सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताना वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार "वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४" 

 देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये श्री.वसंत हनुमान पुरोहित, शिक्षण (शिक्षण महर्षी), (मुंबई). डॉ. वृंदा (सुधा) वसंत पुरोहित, वेद आणि अध्यात्मिक (वेद उपासक -मुंबई),   सौ.विजया भानुदास शिंदे, साहित्य आणि सामाजिक कार्य, (कल्याण). श्री महेश मच्छिंद्र कांबळे (पत्रकारीता -अहमदनगर),  सौ,रेवती कृष्णा आळवे, साहित्य आणि सामाजिक कार्य (मुंबई). श्री.प्रकाशराव शंकर खैरनार, कृषी आणि सामाजिक कार्य (ठाणे), डॉ.चंद्रकांत तुकाराम सावंत, शिक्षण आणि सामाजिक कार्य, (आंबोली, सिंधुदुर्ग), श्री.शशिकांत राजाराम सावंत, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साहित्य, (मुंबई),  श्रीमती सिंधू विश्ववर्तन साळेकर. शिक्षण आणि साहित्य,(पुणे), सुनिल भीमराव सकट, सामाजिक कार्य आणि पर्यावरण (अहमदनगर मनजीतसिंग बतरा, व्यवसाय आणि सामाजिक कार्य, (श्रीरामपूर), मोनिका शिंपी अध्यक्षा, मुक्त आदिवासी महिला बहुउद्देशीय संघ,(धुळे), प्रतिक ओझा, सामाजिक कार्य (श्रीरामपूर). यांचा समावेश आहे.
              येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृत झालेल्या एका रंगारंग समारंभात व्यासपिठावरून बोलताना महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी वर्ल्ड पार्लमेंटद्वारे सातत्याने राबविल्या जाणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांचे तोंडभरून कौतुक तर केलेच परंतु हे सर्व कार्य सुयोग्य रितीने हाताळणारे महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विजेते तथा डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या कार्यशालीचे खास कौतुक करताना डॉ. दत्ता विघावे यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळायलाच हवा. त्यासाठी ते नक्कीच पात्र आहेत असे आवाहन सरकारला उद्देशून केले.
               हमाल साहित्यीक आनंदा साळवे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या कार्यक्रमात साळवे यांच्या शिवाय, अहमदनगर या एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील नवनाथ गवळी, दैनिक स्नेहप्रकाशचे कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे, धुळे येथील नजर १८ चॅनेलचे संचालक सुनिल पाटील, जेष्ठ कवी रज्जाक शेख, अभिनव खान्देशचे संपादक प्रभाकर सुर्यवंशी, राष्ट्रपती पदक विजेत्या मोनिका शिंपी, जेष्ठ साहित्यिका व समाजसेविका संगीताताई जामगे, जेष्ठ कवयत्री सौ.मंजुषाताई ढोकचौळे यांनी आपले विचार मांडले.
      
            तत्पूर्वी डब्ल्यूसीपीएचे सचिव डॉ. शैलेंद्र भणगे व कोषाध्यक्ष सी.के भोसले यांनी अध्यक्षीय सुचना मांडून अनुमोदनाचे सोपस्कार पार पाडले. तर
डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व नवीन कार्यकारणीची घोषणा केली.
            नेहमी प्रमाणे भारतीय समाजात व आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या तुळशीला जलार्पण करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले.
त्याचबरोबर जेष्ठ कवी तथा सेवानिवृत्त न्यायाधीश मा.श्री विलासराव घोडचर यांच्या काव्य हृदयातले व मनातल्या चारोळी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जेष्ठ कवयत्री सौ. संगीताताई जामगे यांच्या तू विश्वाची नारी शक्ती व साथ सूर संगीताची या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
           सुनिल पाटील यांनी अभ्यासपूर्ण व ओघावत्या वाणीने कार्यक्रमाचे सुमधुर सुत्रसंचलन केले तर सहसचिव ऋषिकेश विघावे यांनी आभार प्रदर्शन केले.
close