shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्ह्यातील ‘हा’ दूध संघ देणार त्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० लाखांचे विमा कवच..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
सोमवार  दिनांक १७ जून २०२४

जिल्ह्यातील ‘हा’ दूध संघ देणार त्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० लाखांचे विमा कवच..!!

अहमदनगर : सध्या दुधाला मिळत असलेल्या कमी भावामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. एकीकडे वाढत असलेले पशु खाद्याचे भाव अन दुसरीकडे कमी होत असलेले दुधाचे भाव यामुळे हा व्यवसाय तोट्यात असून अनेकजण दूध व्यवसाय नको रे बाबा असे म्हणत आहेत.

    मात्र अशा बिकट परिस्थितीत देखील एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोदावरी दूध संघ त्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा अपघाती, अपंगत्व विमा कवच देण्यात येणार आहे.

      याबाबत अधिक माहिती देताना गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे म्हणाले कि, ज्येष्ठ नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात मुख्य म्हणजे नामदेवराव परजणे पाटील पशुपालक सुरक्षा विमा योजना अंतर्गत येथील गोदावरी दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा अपघाती, अपंगत्व विमा कवच देण्यात येणार आहे.

स्व. नामदेवराव परजणे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने परजणे परिवार,गोदावरी दूध संघ परिवार व संवत्सर ग्रामस्थांनी सातत्याने प्रवचन व व्याख्यान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, असे कार्यक्रम गेली १४ वर्ष सातत्याने राबविली जात आहे.
यानिमित्ताने यंदाही तालुक्यातील संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयात पहिले पुष्प मंगळवारी (दि.१८) ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे शिवचरित्र प्रेरणादायी वाटचाल या विषयावर प्रवचन होणार आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी उद्धव महाराज मंडलिक हे उपस्थित राहणार आहे. तर दुसरे पुष्पबुधवारी (दि.१९) दुपारी दोन ते चार या वेळेत होणार असून प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे, या विषयावर व्याख्यान होणार आहे.

  तिसरे पुष्प गुरुवारी (दि. २०) जून रोजी डॉ. मिलिंद भोई यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग, या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ज्ञ अनिल गुंजाळ हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेश परजणे व परजणे पाटील परिवार व संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.

    तसेच दूधवाढीसाठी मक्यापासून मुरघास बनवण्यासाठी एनएलएम मुरघास प्रकल्प मशिनरी तसेच अत्याधुनिक स्टरलयाझर, असे १० प्रकारातील फ्लेवरमध्ये सुगंधी दूधाचे निर्मितीसाठी मशिनरी उभारणी केली आहे. त्याद्वारे २०० मिली सुगंधी दूध पीपी व काचेच्या बाटल्यांमध्ये दूध देण्यास (दि.२३) जून रोजी एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेष शहा व राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्या हस्ते प्रारंभ होणार असल्याचे राजेश परजणे यांनी सांगितले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close