shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - २०२४ मतदान करण्याचे आवाहन


नाशिक / विमाका वृत्तसेवा:
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - २०२४ करिता सर्व मतदारांनी २६ जून २०२४ रोजी सकाळी  ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजे पर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.

या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही श्री.सागर यांनी कळविले आहे.

पत्रकार राजु मिर्जा - नाशिक
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close