shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

न्यू लॉ कॉलेज चे परशुराम चंद्रकांत म्हस्के यांचा सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : दि . ११ /   अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथील महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक श्री. परशुराम चंद्रकांत म्हस्के पा. हे नियत वयोमानानुसार रविवार दि. ३०/६/२०२४ रोजी ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव समारंभ शनिवार दि. १५/६/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. असेंब्ली हॉल न्यू लॉ कॉलेज,नगर येथे संपन्न होत आहे.

या प्रसंगी अध्यक्ष मा. अॅड. विश्वासराव दत्तात्रय आठरे पा. (सचिव, अ.जि.म.वि.प्र. समाज, अ.नगर) तसेच प्रमुख अतिथी ह.भ.प. मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे (राष्ट्रीय संत, श्रीक्षेत्र पंढरपूर) प्रमुख उपस्थिती  मा.श्री. जयंत रामनाथ वाघ (सहसचिव, अ.जि.म.वि.प्र.समाज, अ.नगर) ,मा.श्री.जी.डी.खानदेशे (विश्वस्त, अ.जि.म.वि.प्र. समाज, अ.नगर) ,मा.श्री. मुकेश माधवराव मुळे (विश्वस्त, अ.जि.म.वि.प्र.समाज,अ.नगर) , मा.डॉ. विवेक प्रभाकर भापकर साहेब (उपाध्यक्ष, अ.जि.म.वि.प्र. समाज, अ.नगर) ,मा.श्री. नंदकुमार भाऊसाहेब झावरे पा.(विश्वस्त, अ.जि.म.वि.प्र.समाज, अ.नगर) मा. डॉ. चंद्रराव कृष्णराव मोरे (विश्वस्त, अ.जि.म.वि.प्र.समाज, अ.नगर) मा. श्री. रामचंद्रजी हरिभाऊ दरे (अध्यक्ष, अ.जि.म.नि.प्र. समाज, अ.नगर) मा. अॅड. दिपलक्ष्मी संभाजीराव म्हसे पा. (खजिनदार, अ.जि.म.वि.प्र. समाज, अ.नगर) मा.श्री. सिताराम विठ्ठलराव खिलारी (विश्वस्त,अ.जि.म.वि.प्र.समाज, अ.नगर) यांचे उपस्थितीत होणार असून सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य तसेच प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे .
close