shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

साहित्यिक अय्युब पठाण यांचा बिडकीनमध्ये सत्कार


पैठण / प्रतिनिधी:
येथील प्रसिध्द साहित्यिक तथा बालभारतीच्या पाठय पुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगावकर यांनी  सलग ३२ वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा पुणे येथील "साहित्यरत्न" पुरस्कार मिळाल्याने अंगारक संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बिडकीन येथील माऊली मेडीकलचे संचालक आनंद तिवारी आणि सिध्दार्थ साठे व राजू वंजारे यांच्यावतीने साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांचा पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . साहित्यिक तथा बँन्डमास्टर अय्युब पठाण यांनी मोठ्या संघर्षातून साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात आपली प्रतिमा तयार केली असून आता पर्यंत त्यांना विविध सेवाभावी संस्था व संघटना यांच्याकडून ५६ राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहे. 

या अशा या यशाबद्दल  योगेश वाघ, मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे, दावलभाई शेख, संजय माने, जफरखाँ टेलर, इलियास शेख यांनी श्री.अय्युब पठाण यांचे अभिनंदन केले.

*पत्रकार हारुन कासम शेख - पैठण*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close