shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेशोत्सवाने जल्लोषात सुरुवात


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवीन वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत ,मोफत पाठ्यपुस्तक वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार अशा त्रिवेणी संगमाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुधीर पाटील कसार यांनी स्वीकारले.विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एन.माळी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य सर्वश्री उद्धवराव पाटील पवार व राजेंद्र पाटील पवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन करण्यात आली.

विद्यालयात एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे कु.चंचल संभाजी पवार,कु.पूजा बाबासाहेब उघडे व कु.श्रद्धा संतोष जाधव या विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मागील वर्षी झालेल्या एन एम एम एस परीक्षेत सारथी शिष्यवृत्तीसाठी कसार शिवराज संतोष , कसार सार्थक बाबासाहेब, उघडे ओम माधव व चिमखडे सार्थक दिलीप हे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. या विद्यार्थ्यांना सलग चार वर्ष रू.९६०० इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.'इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करा व शिकलेल्या घटकाचा सराव करा', असे चंचल पवार व पूजा उघडे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून सांगितले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात सुधीर पाटील कसार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संभाजी पवार, चि.गौरव संभाजी पवार, बाबासाहेब उघडे, प्रतीक पवार,आसाराम पवार ,जनाबाई जाधव व सावित्रीबाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार,सौ.शितल निंभोरे ,श्रीम.स्वेजल रसाळ ,संतोष नेहूल ,भास्कर सदगीर,सौ.दिपाली बच्छाव ,अविनाश लाटे, श्रीम.सुनीता बोरावके , प्रशांत बांडे, अशोक पवार, संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रज्ञा कसार यांनी केले.तर श्रीम. उषा नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -
*9561174111
close