पुणे प्रतिनिधी:-
वडार समाजाला जागृत करून संविधानाच्या प्रवाहात आणण्यासाठी खरा जर कोणी प्रयत्न केला असेल तर स्व.डाॅ.लक्ष्मणराव देगलूरकर यांनी..
स्व डाॅ.देगलूरकर यांनी नगरला सिव्हिल सर्जन असताना प्रथमतः महाराष्ट्र राज्याचा दौरा करून समाज एकत्रितपणे करून २६ जून १९९४ रोजी अहिल्यानगर(अहमदनगर) येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली महामेळावा घेऊन समाजाच्या मनात नवचैतन्य निर्माण केले.. यांचे सर्व श्रेय डाॅ.देगलूरकर यानांच जाते. या महामेळाव्यातून समाजाची जनजागृती झाली.
स्व डाॅ..देगलूरकर याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे..
सेवानिवृत्त उपसंचालक आरोग्य सेवा,महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक प्रमुख संघटक अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना यांचे दि.25 मे 2024 रोजी वृध्दापकाळाने पुण्यात त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले त्यानिमित्ताने आज दि.17 जून 2024 ला सकल वडार समाजाच्या वतीने मौलाना आझाद सभागृह,कोरेगाव पार्क पुणे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक वडार समाजाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी स्व.डाॅ.देगलूरकर यांच्या विचारांना उजाळा दिला. विदर्भातून आलेले एकमेव महादेव कुसळकर सर विदर्भ अध्यक्ष यांनी डाॅ.साहेबांच्या वडार समाज कार्याबद्दल बोलताना सांगितले की. महाराष्ट्रातील वडार समाजाला संघटीत रावून आपल्याला न्याय व हक्क ,अधिकारासाठी लढा देण्याचा महामंत्र स्व.डाॅ.लक्ष्मणराव देगलूरकर यांनी 1994 ला नगर येथे झालेल्या वडार समाजाच्या महामेळावयात दिला.आणि तेव्हा पासून तर आजपर्यंत अनेक समाजाच्या संघटना तयार झाल्या. यामागे स्व.डाॅ. देगलूरकर साहेब यांची प्रेरणा आहे.
महाराष्ट्रातील वडार समाजाच्या प्रत्येकाच्या मना मनात संघटीत व संघर्षाची ज्योत तेवत ठेवली आहे. आज शोकसभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील सकल वडार समाजाने आप आपल्यातील गट तट बाजूला ठेवून एकत्रितपणे वडार समाजाच्या संविधानीक आरक्षणासाठी खरा लढा दिला पाहिजे आणि हिच स्व.डाॅ देगलूरकर साहेबांना खरी आदरांजली राहिल. यासाठी सकल वडार समाजाने स्व.डाॅ.लक्ष्मणराव देगलूरकर यांचा आदर्श घेऊन निस्वार्थ भावनेने एकत्र आले पाहिजे.. तर विचार करा हीच शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार कडून सदिच्छा..!