shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या ताळमेळासाठी २७ जुन रोजी प्रशिक्षण तर १ जुलै रोजी बैठकीचे आयोजन


 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम ७८ नुसार निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन झाल्याच्या दिनांक पासून ते निवडणुकीचा निकाल घोषित होण्याचा दिनांकापर्यंत हे दोन्हीही दिनांक धरून यादरम्यानच्या कालावधीमध्ये उमेदवाराने निवडणुकीच्या संबंधित केलेल्या अथवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा लेखा सादर करणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण २७ जुन २०२४ रोजी तर निवडणूक विषयी खर्चाचा ताळमेळ घेऊन   खर्च अंतिम करण्याबाबतची निवडणूक खर्च ताळमेळ बैठक १ जुलै,२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय  अहमदनगर येथे आयोजित केलेली आहे.

या प्रशिक्षण व बैठकीसाठी सर्व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी,प्रतिनिधींनी त्यांच्याकडील दैनंदिन खर्च नोंदवही, देयके, प्रमाणके, गोषवारा विवरणपत्र एक ते चार, विवरणपत्र १ ते ११, आधारभूत शपथपत्र,बँक  विवरणपत्र व प्राप्त नोटीस  व खुलासा व अनुषंगिक कागदपत्रे घेऊन प्रशिक्षण व खर्च ताळमेळ बैठकीसाठी   उपस्थित राहण्याबाबतची सुचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केलेली आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close