shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

काचोळे विद्यालयाने केले गुणवंतांचे सत्कार व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत


श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
येथील रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे व एसएससी परीक्षा मार्च २०२४ मध्ये नेत्रदीपक यश मिळवल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार मा.मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, रयत शिक्षण संस्था सातारा, चेअरमन रयत संकुल श्रीरामपूर व मा. प्रकाश पाटील निकम चेअरमन बांधकाम समिती, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.

      प्रथम नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व बिस्किटे देऊन विद्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी बँड पथक व ढोल पथकाच्या तालावर काढण्यात आली. यानंतर मा.मीनाताई जगधने व प्रकाश पाटील निकम यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
         याप्रसंगी एसएससी परीक्षा मार्च २०२४ मध्ये नैपुण्य यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जागतिक पातळीवर प्रकाशित होणाऱ्या मॅक्झिनमध्ये काचोळे विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार राहुल ठोकळ याचे आठ चित्रे प्रकाशित झाल्याबद्दल त्याचा सत्कार मीनाताई जगधने व प्रकाश पाटील निकम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मीनाताई जगधने म्हणाल्या की, मुख्याध्यापक सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालय यशाचे नवीन उच्चांक स्थापित करत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालय अव्वल ठरत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे क्षेत्र करियरसाठी निवडावे आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवावी.
    यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनामार्फत पुरवलेली मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांनी विद्यालयाच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच विद्यालयातील उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीस पूरक आहे विद्यालयाची शिस्त उपक्रम व नियोजन उत्कृष्ट असल्याने आम्ही आमच्या मुलांचा प्रवेश याच विद्यालयात घेतला असे मत पालकातून व्यक्त करण्यात आले.
काचोळे विद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची मोठी गर्दी याप्रसंगी विद्यालयात पाहावयास मिळाली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षिका तनुजा बोरावके व रवींद्र निकम यांनी केले तर नानासाहेब मुठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close