shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

माजी सैनिकांच्या विविध मागण्यांप्रश्नी त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास निवेदन


श्रीरामपूर / प्रतिनिधी 
गेली ६-७  वर्षे व देशात दुर्धर आजार कोवीड -१९ नंतर सैनिक मेळावा न घेण्यात आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील माजी सैनिकांना राज्य ,केंद्र तसेच सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. हे काम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आहे.श्रीरामपूर तालुका हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मोठा व तिन्ही दलाचे मोठ्या संख्येने माजी सैनिक असलेल्या तालुक्यातील एक प्रमुख तालुका आहे , तालुक्यामध्ये अनेक ज्येष्ठ सैनिक, विधवा पत्नी, वीर पत्नी, वीर माता ,अपंग सैनिक असे अनेक सैनिक आहेत, जे सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर येथे जावू शकत नाहीत, त्यामुळे सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा आणी माहिती प्राप्त होत नाही, उदा, विधवांना प्रतिवर्ष मिळणारी आर्थिक मदत, वैद्यकीय मदत व मदतीची माहिती, पाल्यांना मिळणारी शैक्षणिक व आर्थिक मदत, शालेय शिष्यवृत्ती, पाल्य भरती प्रक्रिया, अपंग सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा, मुलींच्या विवाहासाठी मिळणारा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निधी,सीएसडी कॅन्टीन सुविधा अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे निवेदन त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने मा.चित्रसेन गडांकुश (सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर) यांना देण्यात आले आहे.

तसेच माजी सैनिकांच्या सुविधे प्रकरणी शासनाकडून मिळत असलेल्या सुविधांपासुन त्यांना वंचित रहावे लागणार नाही याकरिता लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
 या निवेदनावर त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार ,तालुका अध्यक्ष संग्राम जीत यादव , बाळासाहेब  बनकर ,भगीरथ पवार ,सुनील गवळी ,मंगेश यादव, अमित देशमुख , संतोष देवराय, बाळासाहेब भागडे ,रवींद्र कुलकर्णी , विलास खर्डे, सोमनाथ ताके, असलम शेख ,रामदास वाणी ,अशोक कायगुडे, कैलास खंडागळे ,अनिल काळे, सुधाकर हरदास , चांगदेव धाकतोडे, राजेंद्र कांदे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहे.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close