श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी पॉल शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मॅनेजर फादर शिजो, व्यवस्थापक फादर फ्रांको , प्रिन्सिपल ,सिस्टर सेलिन,सिस्टर दीप्ती, समन्वयक रविंद्र लोंढे सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचा प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सर्वात झाली.सिस्टर दीप्ती यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर डी पॉल इंग्लिश मिडीयम व डी पॉल पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे विविध योगासने व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक केले.सौ सोनम वधवा यांनी योगासनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.सौ रेणुका राऊत यांनी योगदिना विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हेमा कोहली व सौ ज्योती जाधव, यांनी केले.सौ निशिगंधा फोपसे यांनी आभाप्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक संदीप निबे व संदीप जाधव तसेच आशिष अमोलिक , नारायण झांबरे,सुनील बोरागे, दीपक कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे
सहकार्य लाभले.
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111