मुंबई:-
भारतीय गुंतवणूकदार हे भोळे भाबडे व विश्वास ठेवणारे आहेत.. अनेकांना फाॅरेक्स मार्केट मधील ज्ञान नाही. या अज्ञानाचा फायदा फाॅरेक्स मार्केटमधील अनेक कंपन्या घेत आहेत. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की शेअर मार्केटमध्ये खुप फायदा मिळतो. परंतु ज्यांना शेअर मार्केटमधील कुठलेही ज्ञान नाही.. अशा गुंतवणूकदारांची दररोज फसवणूक होत आहे. अनेक अनधिकृत फाॅरेक्स कंपन्या मधील एजंट हे गुंतवणूकदारांना काॅल करून भुलभुलैय्या करून सांगतात की आमची कंपनी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.. आमची कंपनी गुंतवणूकदाराला १० ते १०० टक्के नफा मिळवून देते ,असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गोडीगुलाबीने गुंतवणूक करायला लावतात..त्यानंतर त्यांचे अनधिकृत पणे डिमॅट खाते उघडले जाते.
या डिमॅट कंपन्या फेक असतात .परंतू त्या डिमॅट मधून गुंतवणूकदाराला फक्त एक ते दोन वेळेस विड्राॅल काढुन दाखवतात. आपला विश्वास वाढला की विश्वास संपादन करून त्या डिमॅट मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायला भाग पाडतात. वेगवेगळ्या एक्सचेंज करेंन्सी मध्ये पैसे जमा करून डिमॅट मध्ये जमा करतात. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून दररोजचा नफा १५ ते १०० टक्के नफ्याचा आलेख स्पष्ट दाखवतात.जणू काही गुंतवणूकदाराला करोडपती झाल्याचा भास होतो.
उदा. विड्राॅल Completed असे ॲपवर वरीलप्रमाणे दिसते परंतू आपल्या बॅंक खात्यात पैसे जमा होत नाहीत.. म्हणजेच हे फेक ॲप असते.
परंतू विड्राॅल टाकले की विड्राॅल complete दाखवले जाते. परंतु संबंधित बॅंकेत पैसे जमाच होत नाहीत. आणि डिमॅट मध्ये खोटा नफा झाल्यानंतर खोट्या नफ्यावर कंपनीचे एजंट २० ते ५० टक्के गुंतवणूक दाराकडून कमिशन मागतात. आणि तेही विड्राॅल होण्या अगोदर जमा करा म्हणून सांगतात, अन्यथा तुमची रक्कम बॅक खात्यात जमा होणार नाही .. असे सांगितले जाते. त्यानंतर अगोदर कमिशन जमा करून घेतात. मुद्दलासह मोठी रक्कम जमा झाल्यानंतर एजंट मोबाईल फोन बंद करून ठेवतात. कालांतराने डिमॅट अकाउंट व कंपनीचे app देखील बंद केले जाते. कंपनीचे एजंट मोबाईल फोन बंद करून पलायन करतात... त्यानंतर गुंतवणूकदाराला पुर्ण पुणे फसविले जाते.. त्याची रक्कम हडप केलेली असमत्याला आत्महत्या करण्याची वेळ येते.. असे वारंवार घडत आहे.. परंतु सरकार यावर उपाय योजना करताना दिसत नाही.. म्हणून सरकारने यावर प्रतिबंध करून तातडीने कठोर कायदा करणे फार गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकांना कंपनीच्या कार्यालयाचा खोटा पत्ता दिला जातो.. कार्यालय कुठेतरी आलीशान आहे असे दाखवले जाते.परंतू ते कार्यालय फेक असते. असे ही घडत आहे.. यासाठी भारतीय नागरिकांनी फाॅरेक्स कंपनीत गुंतवणूक करण्याचे शक्यतो टाळावे.. आणि आपली बचत करावी.. हा विषय भारतीय गुंतवणूकदारांचे करोडो रुपये वाचवण्यासाठी आहे.त्यासाठी हि बातमी विनासंकोच शेअर करा, आणि सर्वांना या धोक्यापासून वाचवा ही विनंती.