शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार २१ जून २०२४
जि.प. प्रा. शाळा वांबोरी स्टेशन येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न..!!
राहुरी : जि. प. प्रा. शाळा वांबोरी स्टेशन येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग केला पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक नरवडे यांनी केले.
त्याचबरोबर योग प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन योग आभ्यासक अशोक पवार यांनी केले. तर उपस्थित रावसाहेब कल्हापुरे, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल कारले, प्रकाश देठे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
व्यायामात रंजकता येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षीक करून घेतले. अशोक पवार यांच्या कडून विद्यार्थ्यांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्यासह पालकांनी देखील योगाचे फायदा जाणून घेत विद्यार्थ्यांबरोबर प्रात्यक्षिक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक भुजबळ, करंडे शिक्षिका श्रीमती कचरे यांनी परिश्रम घेतले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600