shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शैला वाघ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


संगमनेर / प्रतिनिधी 
नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर तालुका संगमनेर जि. अहमदनगर येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला दगडू वाघ यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सोहळा २४ मे रोजी गुरुदक्षिणा हॉल, नाशिक येथे मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे कवी अनंत राऊत व महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते पार पडला.
शैला वाघ यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबवीत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अहमदनगर जिल्हा समन्वयक अरुण तुपविहीरे व वेरोनिका गायकवाड यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यस्तरीय निवड समितीकडे केली होती. त्यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेज संगमनेर येथील प्राध्यापक भाऊसाहेब धाकतोडे यांच्या त्या पत्नी होत.

शैला वाघ यांनी आतापर्यंत राज्यस्तरीय जवळजवळ २५ निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि त्यात उल्लेखनीय यश प्राप्त केलेले आहे . तसेच अनेक काव्य वाचन व काव्य गायन स्पर्धांमध्ये देखील यश मिळवलेले आहे.तीन विषयात  बी. ए. तीन विषयात एम. ए. तसेच मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात सेट आणि नेट परीक्षा पात्र झालेल्या आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार मिळाला आहे. त्यास्तव त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*पत्रकार लियाकतखान पठाण संगमनेर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिस, श्रीरामपूर - 9561174111
close