फाटलेल्या आभाळाला थिगळ लावुन शिवता येत नाही
ते आभाळ कोसळुन द्यावेच लागते काळजात
नात्यांचही असच असत उसवली की शिवता येत नाही
फाडुन टाकावी लागतात जिंदगीच्या डिक्शनरीतल्या काही पानांना
काही पानं कोरीच ठेवावी लागतात
पानां फुलां सारखी जपावी लागतात काही काही नाती खासकरुन
काही सजवावी लागतात
वेदनेचाही उरुस भरुन आनंदउत्सव साजरी करावा लागतो
वाटेत कितीही काटे टोचत असतात चालतांणा तरीही प्रवास थांबवायचा नसतो
कारण फाटलेल आभाळ अन तुटलेल काळीज कधिच शिवता येत नाही
आतड्यातल्या दुख्खांना कुठल्याच ओळंब्याने डायगुण्यात सांधता येत नाही
तरीही जिंदगीची गझल गुणगुता आली की जगणं ताला सुरात नसेलही
बेसुरात का होईना जिंदगीची गझल प्रत्येकाला गावीच लागते
कारण फाटलेल्या आभाळाला अन तुटलेल्या काळजाला शिवता येत नाही
आकाश सुपारे
9822510254