shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कु.ऐश्वर्या मंडलिक हिचे नीट परीक्षेत यश


लोहगांव प्रतिनिधी:
 दि. ५ मे २०२४ रोजी एनईईटीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वैद्यकीय पूर्वपरीक्षा (नीट) २०२४ या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून प्रवरानगर ता .राहाता येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या कचरू मंडलिक हिने या परीक्षेमध्ये ७२० पैकी ६२७ गुण मिळवून महाविद्यालयात यश संपादन केले आहे. 

तिच्या या यशाबद्दल जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्या अलका आहेर, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, शिवाजी काळे यांच्यासह शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगाव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close