अजीजभाई शेख / राहाता
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी महात्मा गांधी संकुलात इयत्ता पाचवी व इतर वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन सल्लागार समितीचे सदस्य रतिलाल भंडारी, चंदुलाल तांबोळी, पत्रकार कोंडीराम नेहे, श्रीकांत घोगरे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापक सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्या अलका आहेर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्राचार्य अंगद काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्याग आणि समर्पण तसेच स्वावलंबी शिक्षणाचे महत्व सांगून शाखेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार कोंडीराम नेहे यांनी पालकांच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ, शंकर शिंदे, शिवाजी चेचरे, विशाल साळवे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे, रेणुका वर्पे, नरेन्द्र ठाकरे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी संगीता उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111