shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

झाडावर वीज पडून गाईचा मृत्यू


संगमनेर/ प्रतिनिधी 
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे गुरुवार दुपारी झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसात आढळा वस्ती या ठिकाणी श्री संपत दाजी भाऊ हासे सर्वे नंबर ७६ या वस्तीवर नारळाच्या झाडावरती वीज पडून झाडाखाली बांधलेली गाईचा जागेवरच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की राजापूर येथे दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली यावेळी आकाशात विजा चमकत होत्या, वस्तीवर घरातील व्यक्ती बसलेल्या होत्या, अचानक घरासमोर असलेल्या मोठ्या नारळाच्या झाडावरती वीज कोसळली आणि त्या नारळाच्या झाडाला बांधलेल्या गाईला विजेचा स्पर्श झाल्याने गाय जागेवरच गतप्राण झाली. 

यावेळी कामगार पोलीस पाटील गोकुळ खतोडे, पशुवैद्यकीय अधिकारी संकेत भोर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी गाय मालक संपत दाजी भाऊ हासे, सतीश संपत हासे, डॉक्टर बाळासाहेब दाजी भाऊ हासे,पत्रकार जिजाबा हासे, किरण माधव हासे, अनिल हासे, सतीश चंद्रभान खतोडे आनंद खतोडे, नामदेव हासे, यशोधन कार्यालयाचे जनसेवक उमेश जिजाबा हासे, अरुण हासे हादी उपस्थित होते.

*पत्रकार लियाकतखान पठाण, संगमनेर
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिस, श्रीरामपूर - 9561174111
close