shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आचारसंहितेमुळे लांबलेली कामे त्वरित सुरू करा:- आमदार संजय मामा शिंदे


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १०/ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेली कामे त्वरित सुरु करा अशी सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे. तालुक्यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत योग्य ती खबरदारी घ्या व पावसाळ्यात कोणतीही हानी होणार नाही यासाठी सतर्क रहा, असेही त्यांनी सांगितले आहे. आमदार शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी 2000 कोटीपेक्षा अधिक निधी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी अनेक कामे टेंडर प्रोसेसला आहेत. या कामांची पुढची प्रक्रिया लोकसभेच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. आता आचारसंहिता संपली असून ही मंजूर कामे तात्काळ सुरू करा. ज्या कामांना निधी मंजूर आहे परंतु त्यांची इस्टिमेट अद्याप बाकी आहेत ती पूर्ण करून मार्गी लावावीत अशी सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

आमदार शिंदे म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अर्थसंकल्पामध्ये निधी मिळालेल्या कामापैकी अनेक कामांना स्थगिती दिली होती. त्यापैकी सर्वच कामांची स्थगिती महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून उठली आहे. त्यापैकी डिकसळ पुलाचे काम सुरू आहे परंतु प्रमुख जिल्हा मार्ग असलेले रस्ते अनेक रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. अर्थसंकल्पातील स्थगिती मिळालेल्या या कामांबरोबरच नव्याने डिसेंबर व जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली कामे 2515 ची कामे, 3054, 5054 हेड ची कामे, समाज कल्याण विभागाची कामे, जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र, दलित वस्ती, जलसंधारण विभागाची कामे, दहिगाव योजनेची सुरू असलेली कामे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे सुरू असलेले इमारत बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासंबंधी आमदार शिंदे यांनी सर्व विभागांना सूचित केलेले आहे. लवकरच या सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवल्या जातील व विकास कामे वेगाने पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
close