शासकीय व खासगी शाळांमध्ये सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे- युनूस तांबटकर
अहमदनगर प्रतिनिधी:
आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे. शासकीय शाळामध्ये सुविधा व अनुशासनाचा अभाव असल्यामुळे ते खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडत आहे. अशावेळी शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण दिल्यास ते जीवनात यशस्वी होतील आणि हेच शिक्षण त्या विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.
मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ व रहेमत सुलतान फाऊंडेशनच्यावतीने व दानशूरांच्या सहकार्याने सर्जेपुरा येथील महानगर पालिका शाळा क्रं. ११ व १३ मधील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मराठा सेवासंघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजीत एकनाथ वाघ, जिवन फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद आरिफ, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, कलीम शेख,गुल्लु भाई,राजा भैय्या, शेख अबरार, जबीन इनामदार, खान समिना, चिकने सर, प्रिती बुर्हाडे आदि मान्यवर उपस्थित होते. मिळालेल्या शालेय साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले.
*ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111