shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पोकलेन मधील बिगाड मालकाच्या जिवावर ; बकेटची पिन डोक्यात लागल्याने मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
मंगळवार  दिनांक १८ जून २०२४

पोकलेन मधील बिगाड मालकाच्या जिवावर ; बकेटची पिन डोक्यात लागल्याने मृत्यू..!!

राहुरी :  पोकलेन मशिनच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना मशिनचा चेनलॉक तुटून पोकलेन मशिनच्या नांगिची पीन डोक्यात लागल्याने राहुरी तालुक्यातील सडे येथील  ठेकेदार संदिप संभाजीराव पानसंबळ (वय ४६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
     याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की  राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील वनविभागाच्या नर्सरी जवळ बिबटचे उपचार केंद्र निर्मितीचे काम  सुरू आहे सदर कामाची पायाभरणीचे काम पूर्ण केल्यानंतर पोकलेन मध्ये बिघाड झाला. पोकलेन मशिनचे इतर खोदकाम सुरू असताना बिघाड झाल्याने त्याची दुरूस्ती सुरू होती. अचानक चेनलॉक तुटल्याने मशिनच्या नांगीला असलेली एक अवजड पीन जवळपास २० फुट अंतरावर फोनवर बोलत असलेले मशिनचे मालक संदिप पानसंबळ यांच्या डोक्यात उडून लागली. त्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत संदिप पानसंबळ यांना तात्काळ नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले ; मात्र तेथील वैद्यकीय आधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

      या घटनेची माहिती समजताच माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे तात्काळ नगर येथे रुग्णालयात हजर झाले होते. शवविच्छेदनानंतर काल सायंकाळी संदिप पानसंबळ यांच्या पार्थिवावर सडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

    मयत पानसंबळ माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे विश्वासू,निकटवर्तीय होते. त्यांच्या  स्मितभाषि व शांत स्वभावाने त्यांचा जनमाणसांत दांडगा जनसंपर्क असल्याने सडे गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

     त्यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ,मुलगा,मुलगी असा परिवार आहे. ते राहुरी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष संतोष पानसंबळ यांचे बंधू होत. या घटनेमुळे सडे गावात व संदिप पानसंबळ यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close