shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक' चा पहिला मिल रोलर विधिवत पूजन करून बसविला


श्रीरामपूर/प्रतिनिधी:
 श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेले अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी पहिला मिल रोलर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके यांचे हस्ते विधिवत पूजन करुन बसविण्यात आला.

अशोक कारखान्याच्या आगामी सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठीची हंगामपूर्व मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर आहेत. यंदाचा गळीत हंगाम निर्धारीत वेळेत सुरु व्हावा यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. मशिनरी देखभाल व दुरुस्तीसाठीची योग्य ती तजवीजही करण्यात आली आहे. हंगामपूर्व कामांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी अंमलबजावणी करीत आहे.

कार्यक्रमास संचालक कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, हिम्मतराव धुमाळ, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, यशवंतराव बनकर, ज्ञानदेव पटारे, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर काळे, विरेश गलांडे, अमोल कोकणे, ॲड्.डी.आर.पटारे, शिवाजी मुठे, नारायण बडाख, अंबादास आदिक, सचिन काळे, केशवराव विटनोर, कामगार पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, कार्यलक्षी संचालक अशोक पारखे, गिताराम खरात, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111



close