नाशिक:-
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पै. पानसरे छगन यांना बामसेफ महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य खाजगी माध्यमिक शिक्षक संघटना संघटना सर्वांनी पाचवी जिल्ह्यामधून पाठिंबा दिलेला आहे व संघटना कामाला लागलेली आहे . त्यामुळे समोरील उमेदवाराच्या पायाखालची माती सरकायला लागलेली आहे.डॉ.भास्कर रणनवरे जिल्हाध्यक्ष बामसेफ अहमदनगर दक्षिण महाराष्ट्र राज्या यांनी त्यांना नुकतेच अधिकृत पत्र दिलेले आहे. सन्माननीय गोरखनाथ वेताळ राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नवी दिल्ली,तसेच वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेले आहेत.
यांनी ही धुळे ,नंदुरबार, नाशिक ,जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पैलवान पानसरे सीबी यांना मदत करण्यासाठी आव्हान केलेले आहे. पैलवान पानसरे हे फुले ,शाहू ,आंबेडकर विचाराची विचारशक्ती घेऊन सर्वसामान्य माणसाच्या कामी मदतीसाठी कायम धावून जात आहे .यापूर्वी त्यांनी. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात भर भरून कामगिरी केली आहे. सदर काम करताना त्यांनी बहुजन जनतेचा विकासासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देणारे देणारे कार्य केलेले असल्यामुळे बामसेफ संघटनेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शविलेला आहे. व पाचही जिल्ह्यातून पूर्ण संघटना कामाला लागलेली आहे. या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये पैलवान पानसरे यांना विजयश्री कशी खेचून आणतील यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत.