shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दारुबंदी खात्यासह पोलिस प्रशासनाच्या लक्षात येईल का? ‌रामपूरातील अवैध दारु विक्रीबाबत कोणी लक्ष देईल का ?


रामपुर या गावी अनाधिकृत दारु कायमस्वरूपी बंद व्हावी याकरीता ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन..!

दहा दिवसात दारुबंदी न झाल्यास ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलनाचा इशारा..

श्रीरामपूर प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या मौजे रामपुर ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, याकरीता गावातील १०० महिला भगिनी तसेच बिनविरोध लोकनियुक्त  सरपंच नितिन मच्छिंद्र शिंदे, सदस्य अमित सुरेशराव कोकरे व इतर यांनी मा. सिद्धराम सालिमठ जिल्हाधिकारी अहमदनगर, आणि मा.राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहमदनगर तसेच मा.श्री. सोनोने साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर, यांना गावातील त्रस्त नागरीकांद्वारे अनाधिकृत दारू बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.


पुढील १० दिवसात यावर उचित निर्णय घेवून कडक कारवाई न झाल्यास  दि. १ जुलै २०२४ पासून मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण मार्ग स्वीकारला जाईल असा गंभीर इशाराही  गावातील त्रस्त समस्त महिला भगिनींद्वारे देण्यात आला आहे.
रामपुर गावचे  हद्दीत विक्री केली जात असलेली अनाधिकृत दारू कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गावातील सुमारे १०० महिला यांचे समवेत बिनविरोध लोकनियुक्त सरपंच नितिन मच्छिंद्र शिंदे, सदस्य अमित सुरेशराव कोकरे व इतर यांचे तर्फे मा.सिद्धराम सालिमठ, जिल्हाधिकारी अहमदनगर,
 मा.राकेश ओला,पोलिस अधीक्षक अहमदनगर तसेच मा. श्री.सोनोने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर,यांना गावातील अनाधिकृत दारू बंद होणेबाबत संयुक्तरित्या निवेदन देण्यात आले. 
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,पुढील येत्या १० दिवसात सदरील प्रकरणी योग्य कडक कार्यवाही न झाल्यास दि. १ जुलै २०२४ पासून रामपूर या गावातील ५०० महीलांसहित  मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येइल असा इशाराही देण्यात आला आहे.

         यावेळी नितीन शिंदे , बिनविरोध लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत रामपूर, तुकाराम धनवटे, उपसरपंच, ग्रामपंचायत रामपूर,अमित कोकरे, सदस्य ,ग्रामपंचायत रामपूर व रंजना माळी, सदस्या, ग्रामपंचायत रामपूर. रेखा कुसळकर,सदस्या, ग्रामपंचायत रामपूर आणि इतर सर्व सन्मा.सदस्य /सदस्या समवेत सामाजिक कार्यकर्ते दिपक खेमनर,बाळू उपळकर, उषाबाई भडांगे, आशाबाई भडांगे,रेखा जाधव, आशाबाई उपळकर, अनिता धनवटे,नंदा भडांगे, इंद्राबाई उपळकर,अश्विनी उपळकर,कोमल धनवटे,जया खैरे, विमल धनवटे, सुनिता धनवटे,जनाबाई धनवटे, स्वाती कोळेकर,मुक्ताबाई उपळकर,विठाबाई पांढरे,सुमन गुंजाळ,रुपाली धनवटे, आणि इतर ८० ते ९०  महिलांसमवेत मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close