shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डी डी काचोळे विद्यालयाची चित्रकला जागतिक स्तरावर*


श्रीरामपूर / प्रतिनिधी 
श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा ओंकर राहुल ठोकळ या बालकलाकाराची चित्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या रुरल पॅलेट या मॅक्झिनमध्ये प्रकाशित झाली असून ग्रामीण भागातील कलाकारांची दखल घेणाऱ्या या मॅक्झिनच्या संयोजिका पूजा प्रसून यांनी ग्रामीण भागातील चित्रकारांना संधी मिळावी या उद्देशाने हे मॅगझिन सुरू केले आहे .
ओंकार हा अतिशय गुणी विद्यार्थी असून बालपणापासूनच त्याला चित्रकलेची आवड आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. अशा या गुणी कलाकाराला एक व्यासपीठ मिळणे आवश्यक होते आणि ते ग्लोबल मॅगझिन रुरल पॅलेट या मॅक्झिनच्या माध्यमातून उपलब्ध झाले. 


या मॅक्झिनमध्ये त्याची एकूण आठ चित्रे प्रकाशित झालेली आहे. हे मॅक्झिन समाजातील विविध भागातील मुलांची अतुलनीय कलाकृती दाखवते. ज्यात ग्रामीण भागातील मुलांवर लक्ष केंद्रित केले जाते या मॅक्झिनचे ध्येय तरुण कलाकारांचे तेज प्रकाशित करणे, त्यांना त्यांच्या कलागुणांना जगासमोर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आहे. तसेच सीमा ओलांडून लोकांना एकत्र आणण्याच्या कलेच्या सामर्थ्यावर या मॅक्झिनचा विश्वास आहे.
         राहुलच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आणि रयत संकुल श्रीरामपूरच्या चेअरमन मीनाताई जगधने तसेच प्रकाश पाटील निकम यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांच्या सहकार्याने व चित्रकला शिक्षक अब्दुल रजाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल चित्रांचा सराव करत आहे. राहुलच्या या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विविध समित्या यांनी अभिनंदन केले.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close