shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर शहर कॉंग्रेस कमेटीच्यावतीने राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी...


राजर्षी शाहू महाराज सामाजिक,शैक्षणिक
 व सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत - ससाणे

 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राजर्षी शाहू महाराज सामाजिक,शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करत त्यांच्या कलागुणांना, क्रीडा, कसरतीला राजाश्रय मिळवून दिला. गावोगावी शिक्षणाच्या गंगेबरोबरच व्यायाम शाळा ही बांधल्या. राजर्षी शाहू महाराजांनी सर्व स्तरातील सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी कार्य केले. मुलींच्या मोफत शिक्षणाबरोबरच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. 

शेती,व्यापार,उद्योगधंदे यांच्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून महाराजांनी अनेक उपाययोजना केल्या. प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे यावर राजर्षी शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता. महाराजांनी आपल्या आधुनिक विचारांनी समाजात मोठी क्रांती घडवून आणली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद,  रावसाहेब आल्हाट, प्रवीण काळे, डॉ.राजेंद्र लोंढे, अमोल शेटे, सुरेश ठुबे, अशोक जगधने, रितेश चव्हाणके, सुनील साबळे, रितेश एडके, नवाज जहागीरदार, सरबजीत सिंग चूग, संतोष परदेशी, योगेश गायकवाड, गणेश काते, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी आदी मान्यवर उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर 
*9561174111
close