shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नाशिक विधान परिषदेमध्ये आडथळा शर्यतीत पैलवान पानसरेची आगे कुच


नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक निवडणुकीतून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी

अहिल्यानगर (अहमदनगर):-जिल्ह्यातील सर्वात जास्त उमेदवार अर्ज भरण्यामध्ये पुढे आले . सुरुवातीपासूनच पैलवान पानसरे हे चित्र पालटणार असं लक्षात येत होतं.या संदर्भात पै.डॉ.छगनराव पानसरे यांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये सर्वांना एकत्र येण्यासाठी विनंती केली .वास्तविक पाहता या शिक्षक आमदारकीमध्ये अनेकांनी अनेक वेळा उमेदवारी केली परंतु त्यांना अयश आले?असे उमेदवार उत्सुक होते .पै.डॉ.छगनराव पानसरे यांचे म्हणणे असे की दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी पुढे येऊन एक जणनी शिक्षक आमदारकी करावी. तर दुसऱ्याने पदभरती करावी. श्वासातील वाद घालू नये. हा वाद मिटवावा . नगर जिल्ह्यातून अनेक वेळा अनेकांनी आमदारकीची उमेदवारी  केलेली आहे.परंतु नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी माझी एक विनंती आहे .नाशिक मधून एकच सुर निघाला ही शिक्षक आमदारकी आहे की सोसायटी. त्यावेळेस प्रशांत मस्के यांनी पै. डॉ. छगनराव पानसरे यांचे नाव पुढे केले.

या ठिकाणी अनेक युक्ती वाद झाले. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात प्रथम बाहुल्या वर चढणारा पैलवान पानसरे हे नाव निश्चित झाले.सर्वात प्रथम त्यांनी फॉर्म भरला पै.पानसरे यांचा फॉर्म भरल्यानंतर नगर जिल्ह्यातून पानसरे नावाचे अनेक उमेदवार तयार झाले. प्रत्येकाची समजूत काढत काढत पैलवान पानसरे अधिकृत उमेदवारी करत होते .त्यावेळेस दिलीपराव पानसरे यांचा अर्ज त्या ठिकाणी होता .दत्ता पानसरे यांनी अर्ज भरला होता .परंतु यांच्या चर्चेनंतर दत्ता पानसरे यांनी अर्ज घ्या मागे घेतला. पैलवान पानसरे यांनी भाऊचे आभार मानत  पुढे चाल केली. पैलवान हा शब्द लावल्यामुळे फॉर्म भरल्यानंतर युक्तिवाद सुरू झाला की नावाच्या पुढे पैलवान लावायचं का परंतु या ठिकाणी युक्ती वाद झाल्यानंतर पै .शब्द लावण्यात यशस्वी झाले .त्या संदर्भात सगळी पुरता करत प्रत्येकाची ओळख करून दिली. ओळख करून देताना डॉक्टरला सांगावे लागते मी डॉक्टर आहे .इंजिनिअरला सांगावे लागतं मी इंजिनिअरिंग वकिलाला सांगावे लागते मी वकिल आहे .परंतु पैलवानाला सांगावं लागत नाही मी पहिलवान आहे म्हणून दिसताच कळतोय पैलवान वस्ती पाहता पैलवान छगन पण सर यांना कुस्तीमध्ये सर्व राष्ट्रीय प्रमाणपत्र सादर करावी लागली त्यात ते यशस्वी झाले. ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांना खाली माना घालत बाहेर पडावं लागल.आणि म्हणून निवडणुकीमध्ये पै हा शब्द लावण्यास अधिकाऱ्यांनी मान्यता दिली .परंतु सदर घडामोडीमध्ये कोल्हे नावाचे चार उमेदवार असल्यामुळे असे काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले . अहमदनगर मधील एकूण 17 उमेदवार होते परंतु पैलवान पानसरे यांच्या विनंतीला मान देऊन अनेकांनी माघार घेतली सदर घटनेमध्ये पैलवान पानसरे खूप मोठ्या शिताफीने यशस्वी झाले. पण पै. डॉ.पानसरे यांना जे अनेक उमेदवार आहेत ते सपोर्ट करण्यास उत्सुक आहेत कारण ही निवडणूक पसंतीची आहे एकमेकांची विरोधातली नाही. असाच सपोर्ट भेटला तर चाणक्य आणि बुद्धिवान त्याचं नाव पैलवान. डॉ.छगनराव पानसरे विजय होऊ शकतात अशी चर्चा आहे.
close