shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दिवंगत डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर यांची शोकसभा पुणे येथे संपन्न...!


पुणे :- सोमवार दि. 17 जुन 2024 रोजी दिवगंत माजी आरोग्य उपसंचालक डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर यांचे दुःखद निधनाची शोकसभा मौलाना आझाद सभागृह कोरेगाव पार्क पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दिवंगत डॉ. देगलूरकर साहेब यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.
       शोक सभेचे अग्रस्थानी मा. श्री. एस.एन. पवार सेवानिवृत्त - शिक्षण सह संचालक होते. वडार समाजाचे संघटन करून 26 जून 1994 चा अहमदनगर येथे 2 लाखांचा महामेळावा यशस्वी करून समाजाची ताकद दाखवून समाजाचे आवश्यक मागण्या शासनाकडून मान्य करून घेतले होते.
      डॉ. देगलूरकर साहेब सरकारी नोकरीत असताना देखील समाजाचे उत्तम संघटन करून समाजात जागृती निर्माण केले. त्यांचे विचार घराघरात पोहचविणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
        संघटनेचे जुने सदस्य मा. श्री. दिलीप कुसाळे यांनी डॉ. देगलूरकर साहेबांचे पहिले भेटीपासुन ते संघटनेचे प्रती असणारी तळमळ आणि समाजाला शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचाराने प्रगती होईल. डॉ. देगलूरकर साहेबांनी समाजाला शिक्षणातून प्रगती करता येईल. एकीचे बळाने सताधाऱ्यांना नमविता येऊ शकते. असे अनेक वेळा मत व्यक्त केले आहे असे सांगितले.
       याप्रसंगी विवेक देगलुरकर यांनी बाबांचे विचार समाजाचे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नव्याने संघटन निर्माण करून समाजाला एकत्रित आणण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. देगलूरकर साहेबांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार असुन त्याप्रसंगी मोठया संख्येने समाज बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
       कर्नल श्री. ऋषी धोत्रे साहेब यांनी डॉ. देगलूरकर साहेब हे सर्व क्षेत्रातील ज्ञान बाळगुन व सामाजिक प्रश्नांची जाण असणारे आणि ती सोडविण्याची दूरदृष्टी असलेले नेते होते. असे विचार व्यक्त केले.
       सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी श्री. शामराव पवार यांनी डॉ. साहेबांचे जवळून पाहिलेले अनुभव तसेच संघटना बांधणीपासुन आजपर्यंतचे आठवणी सांगताना डॉ. साहेब संघटनेचे कार्यकारणीत असते तर समाजाचा विकास अधिक वेगाने झाला असता असे विचार मांडले.
close