श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील सेंट झेवियर्स शाळेमध्ये २१ जून रोजी योग दिनानिमित्त प्राचार्य फा. विक्रम शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शाळेचे क्रीडा शिक्षक नितीन तमनर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नियमित योगा केल्याने निरोगी व सुदृढ शरीर मिळते. तणावमुक्त आयुष्य प्राप्त होते. मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योग अंगीकारणे उत्तम आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.पूर्वा कोठारी हिने या कामी त्यांना सहकार्य केले. तसेच प्राथमिक विभागात योग प्रशिक्षिका हेतवी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*वृत्तविशेष सहयोग
रवींद्र त्रिभुवन (सर), श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111